Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना जळकोट तालुका प्रमुखपदी मुक्तेश्वर येवरे-पाटील

शिवसेना जळकोट तालुका प्रमुखपदी मुक्तेश्वर येवरे-पाटील

अतनूर:येथील मुक्तेश्वर गोविंदराव येवरे-पाटील अतनूरकर यांची शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या जळकोट तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या आदेशाने संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या सूचनेनुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसेना जळकोट तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली असल्याचे सांगितले.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समिती अहमदपूरचे सदस्य संतोष रोडगे, विधानसभा अध्यक्ष श्रीमंतदादा सोनाळे-पाटील, विधानसभा समन्वयक प्रकाश हैबतपूरे, शिवसेना महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख आरूणाताई लेंडाणे, युवासेना जिल्हा समन्वयक शैलेश वडगावे, शिवसेना नेते व्यंकट साबणे, उदगीरचे नव निर्वाचित तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, अनिल ढोबळे, अभंग मोहटे, अमोल गुट्टे, श्रीरंग केंद्रे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात