भाकसखेडा(प) येथे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत व पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण
उदगीर: शिवछत्रपती युवक गणेश मंडळ, छ.शिवाजी महाराज चौक उदगीर यांच्या वतीने श्री जगदंबा देवी मंदीर भाकसखेडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. उदगीर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम,मंडळ अधिकारी पंडित जाधव,मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील, सचिव बाळासाहेब पाटोदे, राजकुमार मोगले श्री.सतीश पाटील मानकीकर,श्री. राहुल अतनुरे, श्री.अंकुश ताटपल्ले,श्री.बाबासाहेब पाटील, राम जाधव यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी वि.का.से.सोसायटी गंगापूर-भाकसखेडाचे चेअरमन श्री.विवेक पंडितराव जाधव, ग्रा.पं. भाकसखेडाच्या सरपंच अर्चनाताई खेडकर, उपसरपंच अरविंद मोरे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी माधवराव टेकपुंजे, दयानंद मोरे, सतीश मोरे, धनाजी मोरे,लक्ष्मण जाधव, नृसिंह जाधव, अभिषेक जाधव, साईनाथ खेडकर आदी गावातील युवक उपस्थित होते.
0 Comments