Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*गोरगरीब रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा : माजी मंत्री आ.संजय बनसोडे*

*गोरगरीब रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा : माजी मंत्री आ.संजय बनसोडे*

*उदगीर* : मागील अनेक वर्षापासून उदयगिरी लाॅयन्स नेत्र रुग्णालया मार्फत लाखो रुग्णांना दृष्टी देण्याचे काम या रुग्णालयाच्या माध्यमातून झाले असून येत्या काळात महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातुन लाखो रुग्ण आपल्या लॉयन्स नेत्र रुग्णालयात येऊन उपचार घेतील त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आपण देशाचे नेते श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या नावाने धर्मशाळेची उभारणी केली आहे या माध्यामातुन गोरगरीब रुग्णांची  व त्यांच्या नातेवाईकांची सोय होईल कारण गोरगरीब रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे मत राज्याचे माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते लाॅयन्स नेत्र रुग्णालय परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या मा.श्री. शरदचंद्र पवार नेत्र रुग्ण धर्मशाळेच्या इमारतीच्या निरीक्षण भेटी प्रसंगी बोलत होते. 
यावेळी बसवराज पाटील नागराळकर, लाॅयन्स नेत्र रुग्णालयाचे प्रमुख डाॅ.रामप्रसाद लखोटिया, ईश्वरप्रसाद बाहेती, महेश बसपुरे, प्रदीप बेद्रे, प्रा.श्याम डावळे, बालाजी भोसले, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, अमोल अनकल्ले, अनिल मुदाळे, डाॅ.भाग्यश्री घाळे, डाॅ.सागर समगे,डाॅ.ममता समगे, डाॅ.मेघा बिरादार, डाॅ.मैथिली लवटे, डाॅ.शितल पेद्दावाड, डाॅ.सोनाली केंद्रे,
व्यंकट बोईनवाड, इमरोज हाशमी,  अॅड.व्यंकट मोरे, प्रा.एस.एस. पाटील, प्रमोद केंद्रे, मदन तुळजापुरे, तानाजी हजारे, विवेक जैन, रवि जवळे, विजय होनराव, अभय संगेवार, प्रदिप पवार, हिफ्जुरहेमान हाशमी, सोनु हाशमी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी,
गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शरदचंद्रजी पवार यांच्या नावाने धर्मशाळेची उभारणी केली. या धर्मशाळेसाठी सुमारे १ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला होता. आज त्या निधीतून एक सुंदर वास्तू उभा राहिली असल्याचे पाहुन आ.संजय बनसोडे यांनी समाधान व्यक्त केले.
तळ मजल्यावर श्रीमती शकुंतलादेवी बनसोडे लाॅयन्स दंत रुग्णालय व जनरल हाॅस्पिटलचीही उभारणी करण्यात आली असुन त्याची ही पाहणी आ.बनसोडे यांनी केली. पुढील काळात मोबाईल मेडिकल डेंन्टल व्हॅनसाठी निधी उपलब्ध करुन देणार असुन. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत जनतेची निष्ठेने सेवा करणार असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी उदयगिरी लाॅयन्स नेत्र रुग्णालायातील डाॅक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात