स्तुत्य उपक्रम राबवल्याने नवतरुण युवकांचे कार्य कौतुकास्पदच ; तहसिलदार राम बोरगावकर
उदगीर:श्रीरामनवमी निमित्ताने श्री.हावगीस्वामी चौक, रोकडा हनुमान रोड येथील हनुमान मंदीर चौक येथे अहिल्या बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हावगीस्वामी चौक, उदगीर च्या वतीने तसेच नवतरुण युवक मंडळ व श्री.सदगुरू श्री.उदालिक ऋषी उदागीरबाबा महाराज यांच्या पावनभूमीतील आशीर्वादाने प्रेरणेने श्रीराम नवमी निमित्ताने व रोकडा हनुमान महाप्रसाद निमित्ताने सर्वसामान्य अबालवृद्ध महिला, पुरुष, लहान बालके, विद्यार्थी-विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, पोलीस प्रशासन सह कष्टकरी, कामगार, इमारत बांधकाम व कामगारांसाठी श्रीराम नवमी निमित्ताने भरदिवसा व भरउन्हात भव्यदिव्य रॅली काढली जाते. यात सर्व भाविक भक्तांना शरबत व लिंबू पाणी, पिण्याच्या शुद्ध व थंड पाण्याची उत्तम व उत्कृष्ट व्यवस्था चे आयोजन करण्यात आले होते. याचा रॅलीतील हजारो भावी भक्तांनी, अबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, भजनी मंडळ, वारकरी, ह.भ.प, लहान मुले, मुलींनी मोठ्या संख्येने लाभ घेता सहभाग घेतला होता. रॅली संपल्या नंतर रामनवमी निमित्ताने व श्री रोकडा हनुमान मंदिरात भक्तांनी अन्नदान रुपाने दिलेला महाप्रसादाचा लाभही परिसरातील भाविकांनी घेतला. लहान विद्यार्थी व अहिल्या बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हावगीस्वामी चौक उदगीर, विविध सेवाभावी संस्था, हावगीस्वामी चौकातील नवतरुण युवक मंडळ यांनी एकत्रित येऊन हा स्तुत्य उपक्रम राबवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून उदगीरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार राम बोरगावकर, उदगीर शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष नूतन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी, पोलीस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक मोहिते साहेब, उदयगिरी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल व अपघात विभाग, उदगीरचे डॉ.माधव चंबुले, उदयगिरी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल व अपघात विभाग, उदगीरचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ, मधुमेह तज्ञ, डॉ.लक्ष्मण ढोकाडे, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक व ज्येष्ठ पत्रकार संजय उर्फ बाळासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच सतीश पाटील मानकीकर, कपाळे यांच्या उपस्थितीत व यांच्या हस्ते शरबत चे वाटप करण्यात आले. तसेच यांच्या हस्ते श्रीरामाच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून व रस्त्याने निघणाऱ्या भव्यदिव्य श्रीरामाच्या तैलचित्रास आरती, पुष्पहार व श्रीफळ फोडून रॅली पुढे आगमस्थ झाली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहिल्या बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत अर्जुनराव जाधव-पाटील, उपाध्यक्ष अर्जुनराव जाधव, सचिव अनिकेत जाधव-पाटील, बालाजीराव जाधव, डॉ. अशोकराव भोसले, महेश देवणीकर, अलोक नुत्ते, सतीश मुळे, गणेश चौधरी, आशुतोष राणा, जयेश गोस्वामी, प्रज्वल हैबतपुरे, अमोल लोहकरे, सौरभ गुडमेवार, आदित्य कुलकर्णी व सर्व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.
0 Comments