उदयगिरी महाविद्यालयात कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न,पाच जणांवर गुन्हा दाखल
उदगीर:उदयगिरी महाविद्यालयात कर्मचाऱ्यांना फायटरणे मारून जखमी केल्याप्रकरणी पाच जणांवर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ५ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ५ एप्रिल रोजी साडे बारा वाजेच्या सुमारास विकास विलासराव वट्टमवार हे उदयगिरी महाविद्यालयात शासकीय कर्तव्यावर असताना आरोपीने कॉलेजचे विद्यार्थी नसताना कॉलेज मध्ये बेकायदेशीर रित्या कार घुसून प्राचार्यांच्या कार्यालयाभोवती भरधाव वेगाने चालवीत होते,त्यावेळी फिर्यादी त्यांना थांबविले असता थांबविल्याचा राग मनात धरून आरोपीने शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीला फायटरणे डोक्यात,जबड्यावर,ओठावर मारून जबडा फ्याक्चर केला,तसेच काठीनेही डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी विकास विलासराव वट्टमवार वय ३९ वर्ष व्यवसाय नौकरी राहणार समता नगर उदगीर यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी फैसल अमजद हाश्मी, शहेबाज अमजद हाश्मी,आयान मजहर देशमुख, सलमान खलील शेख,फैजान उस्ताद यांच्यावर गुरंन १७७/२५ कलम १०९(१) १३२,१२१(१) १२१(२) १८९(२) १९१(२) १९०,२८१ भारतीय न्याय संहिता व सह कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत.
0 Comments