Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

चिमुकली मुलींचा खून करणाऱ्या राक्षकी बापाचे कारनामे

चिमुकली मुलींचा खून करणाऱ्या राक्षकी बापाचे कारनामे

उदगीर पासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या भीमा तांडा येथे  एका चार वर्षीय चिमुकलीचा राक्षसी बापाने गळा आवळून खून केला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला,राक्षसी बापाला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या,आरोपी बालाजी बाबू राठोड यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आरोपींची आई मंगलबाई बाबू राठोड यांच्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी पडली मंगलबाई खचून न जाता मुंबई पुणे येथे मोलमजुरी करून सहा मुलीचे लग्न केले,सहा मुलीचे लग्न झाल्यानंतर बालाजी राठोड हा वयाला आल्याने आईने आपल्या हाताखाली सून हवी म्हणून बालाजी बाबू राठोड यांचे लग्न केले,तर लहान मुलगा राजू राठोड हा नाईक चौक येथे एका हॉटेलमध्ये काम करायचा,बालाजी बाबू राठोडला लग्नाच्या अगोदर पासून दारूचे व्यसन जडले होते,आरोपींच्या आईने सावकारी कर्ज काढून बालाजी राठोड यांना ऑटो घेऊन दिला, बालाजी राठोड यांनी उदगीर शहरात बरेच दिवस ऑटो चालविला,बालाजी राठोड यांना अगोदर एक मुलगा व नंतर एक सुंदर मुलगी झाली बालाजी राठोड यांनी सकाळपासूनच दारूच्या आहारी जाऊ लागला दारूच्या नशेत पत्नी,आई,व भावाना दररोज मारहाण करायचा भावकीतही भांडण करायचा,उदगीर मध्ये ऑटो चालवत असताना दररोज कोणाबरोबरही भांडण करायचा कोणाला मारहाण करायची तर कोणाच मार खाऊन घरी यायचा याचे कारनामे पाहून आईने ऑटो विकून टाकला व दोघा पती पत्नीला मुंबई येथे कामाला पाठवले मुंबई येथे काम करताना तेथेही कोणाबरोबरही भांडण करायचा तेथेही याचे कारनामे बघून याला कोणीही कामाला लावत नव्हते,बालाजी राठोड यांनी मुंबई येथून आपली दोन मुले व पत्नीला घेऊन गावाकडे आला, गावकडे आल्यानंतर उदगीर शहरात मोल मजुरीने काम करायचा मिळालेल्या मजुरीच्या पैशातून दररोज दारू ढोसायांची संध्याकाळी घरी गेल्यावर  पत्नीला मारहाण करायचा,आईला याचा रोजचा त्रास सहन होत नव्हता अखेर आईने त्यांचा लहान मुलगा राजू राठोड याला घेऊन बाजूला झाली,त्याला घरही देऊन टाकले,व आईने सांगितले बाळा पत्नी दोन मुले घेऊन सुखाने संसार कर विनाकारण पत्नीला दारू पिऊन त्रास देऊ नकोस असे सांगायची परंतु बालाजी राठोड आईला मारहाण करायचा आईला,पत्नीला, भावाला यांनी जिवंत पणी भयंकर यातना दिली,पत्नीने याच्या त्रासाला कंटाळून तीन महिन्या पूर्वी माहेरी निघून गेली,याच्या वागणुकीमुळे गावात याला कोणीही जवळ येऊ देत नव्हते कोणीही जेवण देत नव्हते,९ जून २०२५ रोजी त्याची मुलगी अरुषी बालाजी राठोड हिला त्याची सासुरवाडी लिंबोटी येथुन पत्नीला मारहाण करून,सासू सासऱ्यासोबत भांडण करून भीमा तांडा येथे आणले,२९ जून रोजी बालाजी राठोड रोजच्या प्रमाणे उदगीर येथे कामाला आला,काम न मिळाल्याने दुपारी आपल्या घरी भीमा तांडा येथे गेला त्याला भूक लागली होती, त्याला कोणी जेवण देत नव्हते, बालाजी राठोड यांनी त्यांची चिमुकली मुलगी अरुषी बालाजी राठोड हिला जवळ बोलावून घेतले,बाळा मला भूक लागली आहे माझे नावं घेऊ नको माझे नाव घेतल्यावर तुला कोणीही भाकर देणार नाही,मला भूक लागली आहे असे सांगून भाकर मागून आण तुला चॉकलेटसाठी पैसे देतो असे सांगितले चॉकलेटच्या आशेने चिमुकली अरुषी बालाजी राठोड तांड्यातील एका शेजारच्या घरात जाऊन मला भूक लागलीय आहे मला भाकर द्या असे सांगितले चिमुकलीचा गोड शब्द ऐकून शेजाऱ्यांनी त्या चार वर्षीय मुलींला भाकर दिली मुलीने भाकर घेऊन पळत पळत जाऊन त्याच्या नराधम वडिलांना नेऊन दिली वडिलांनी भाकरीवर ताव मारताना चिमुकली मुलगी अरुषी राठोड यांनी पप्पा मी तुम्हाला भाकर आणून दिली मला चॉकलेटसाठी पैसे द्या आता असा हट्ट धरला निर्दयी राक्षशी वृत्तीच्या बापाने जेवण केल्यावर तू मला पैसे मागतेस म्हणून त्या चार वर्षीय निरागस गोंडस मुलींचा २९ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरात हाताने गळा दाबून खून केला व नंतर साडीने फाशी देऊन घरात लटकावले.बापाला भाकर मागून आणून देणाऱ्या त्या निष्पाप मुलींचा काय दोष अशा नराधमास जिवंत सोडू नका फाशीची शिक्षा द्या अशी मागणी मुलींच्या आईने टाहो फोडत केली.

Post a Comment

0 Comments

जाहिरात