बीदर रोड उड्डाणपूल येथे चोरट्याने दुचाकी स्वारास अडवून लुटले
उदगीर शहरातील बिदर गेट येथील उड्डाणपूल खालून जाणाऱ्या दुचाकीस्वारास अडवून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुचाकीस्वाराच्या खिशातील रोख रक्कम १५ हजार २०० रुपये व १७ हजार रुपयांचा मोबाईल आणि ३० हजार रुपयांची दुचाकी असे एकुण ६२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी १ जुलै रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २८ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास चोरट्याने शहरातील बिदर गेट येथील जंगली धाबा जवळ फिर्यादीच्या खिशातील २०० रुपये दराच्या ७६ चलणी नोटा असे एकूण १५ हजार २०० रुपये व सॅमसंग गॅलक्सी- ए १५ कंपनीचा मोबाईल ज्याची अंदाजे किंमत १७ हजार रुपये, व पॅशन प्रो कंपनीची मोटार सायकल क्र. एम.एच.२४ ए एल १६९५ ज्याची किम्मत अंदाजे ३० हजार रुपये असा एकुण ६२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आरोपिने संगणमत करुन घेवुन गेले आहे. शिवकुमार बसवंतअप्पा कप्पीकेरे रा.विजय नगर कॉलनी बिदर नाका, उदगीर हा. मु. शेल्हाळ रोड उदगीर ता.उदगीर यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अनोळखी दोघांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल चिमोले हे करीत आहेत.
0 Comments