उपविभागीय अधिकारी कार्यालय उदगीर व तहसील कार्यालय उदगीर आय एस ओ मानांकित
उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे मा. मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून १०० दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमा अंतर्गत नागरिकांना सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी कार्यालय उदगीर येथे श्रीमती. वर्षा ठाकूर-घुगे मा. जिल्हाधिकारी, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली कृती आराखडा राबविण्यात आलेला असून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याबाबतची पहाणी करण्यासाठी श्रीमती. वर्षा ठाकूर-घुगे मा. जिल्हाधिकारी, लातूर यांनी दि.०९/०४/२०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, उदगीर व तहसील कार्यालय, उदगीर येथे भेट दिली. उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांचे नाम फलक व त्याच्याकडे असलेल्या आस्थापने विषयीच्या कामकाजाचा उल्लेख असलेला कार्यपटल (जॉब चार्ट) तसेच अभ्यांगताना बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, दिशादर्शक फलके, स्वच्छतागृह, महिलांसाठी हिरकणी कक्ष, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अर्ज / निवेदन लिहिण्यासाठी लेखन फळी, कार्यालयात अभिलेखाचे निंदनीकरण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावतीकरण करण्यात आले. नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार पेटी, महिलांसाठी विशाखा पेटी व सूचना पेटी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून दर आठवड्याच्या सोमवारी सदरच्या पेटीतील प्राप्त तक्रारी च्या अनुषंगाने आवश्यकती कार्यवाही अनुसरण्यात येते. सदरच्या सर्व सुविधा या आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेकडून (ISO 9001:2015) ठरविण्यात आलेल्या माणकानुसार रचना करून तपासणी करण्यात आली. त्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालय उदगीर व तहसील कार्यालय, उदगीर ला आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेकडून (ISO 9001:2015) ISO Certificate प्रदान करण्यात आले. त्याबाबत श्रीमती. वर्षा ठाकूर-घुगे मा. जिल्हाधिकारी, लातूर यांनी श्री. सुशांत शिंदे उपविभागीय अधिकारी, उदगीर यांना सदरचे ISO Certificate देऊन गौरविण्यात आले त्याप्रसंगी श्री. राम बोरगावकर तहसीलदार उदगीर, श्री.डी. के. मोरे नायब तहसीलदार, श्रीमती. राजश्री भोसले नायब तहसीलदार, श्रीमती. सुमित्रा ईलमले पुरवठा निरीक्षण अधिकारी व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच श्रीमती. वर्षा ठाकूर-घुगे मा. जिल्हाधिकारी, लातूर यांनी सदरच्या केलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून पुढील कार्यासाठी सर्व अधिकारी/कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
0 Comments