उदगिरात शाॅक लागुन २२ वर्षीय महिलेचा मृत्यू...
उदगीर शहरातील निडेबन येथे २२ वर्षीय महिलेला स्वतःच्या घरी इलेक्ट्रिक शाॅक लागुन मृत्यू झाला. याप्रकरणी मंगळवारी (१६ जुलै) सकाळी १२ च्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पल्लवी सुनील पांढरे (वय २२ वर्षे रा.निडेबन ता. उदगीर) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१५ जुलै रोजी सकाळी निडेबन येथे पल्लवी सुनील पांढरे (वय २२ वर्षे रा.निडेबन ता. उदगीर) स्वतःच्या घरी इलेक्ट्रीक शाॅक लागल्याने त्यांना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू नोंद झाली. सदरील घटना उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात येत असल्याने सदरची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे करीत आहेत.
0 Comments