Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

जय हिंद पब्लिक स्कुल येथे अंध आदिवासी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ऑट्रासिटी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

जय हिंद पब्लिक स्कुल येथे अंध आदिवासी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ऑट्रासिटी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर शहरा लगत असलेल्या जय हिंद पब्लिक स्कुल शाळेत एका १६ वर्षीय अल्पवयीन अंध आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात २ मार्च रोज रविवारी साडे तीन वाजेच्या सुमारास आरोपीविरुद्ध ऑट्रासिटी व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की उदगीर शहरा लगत असलेल्या जय हिंद पब्लिक स्कुल या नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका १६ वर्षीय अंध आदिवासी अल्पवयीन मुलीला आरोपीने तुझ्या आईचा फोन आला आहे असे सांगून बोलावून घेवून २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता अल्पवयीन मुलगी ही अनुसूचित जमातीची आहे असे माहीत असतानाही फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध मनास लज्जा वाटेल असे आरोपीने कृत्य केले व फिर्यादीच्या दोन मैत्रिणी सोबत ही लज्जा वाटेल असे कृत्य केले.सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुपमा केंद्रे यांनी जय हिंद पब्लिक स्कुल येथे जाऊन पीडित मुलींचा जबाब नोंदवून पीडित मुलींच्या फिर्यादी वरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी मुरली बाजीराव देशमुख वय ५६ वर्ष यांच्यावर गुरंन १०४/२५ कलम ७४,७५,(१) भारतीय न्याय संहिता सह कलम ७,८ पोक्सो सह कलम ३ (१),(w),(ii),३ (२),(५अ) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात