राजेश्री जनरल स्टोअर्स मध्ये बनावट "गुड नाईट" विक्री; एकाविरुध्द गुन्हा दाखल
उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजश्री जनरल स्टोअर्स येथे बेंगलोर येथील लिगल रिप्रझेंटीव्ह ऑफीसर छापा टाकून गोदरेज कंपनीचे स्टिकर असलेल्या गुड नाईट गोल्ड फ्लॅश लिक्विडच्या ४५ एम एल च्या बनावट बाटल्या जप्त करुन शुक्रवारी २८ मार्च रात्री उशिरा उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २८ मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजश्री जनरल स्टोअर्स येथे आरोपीने गोदरेज कंपनीचे स्टिकर असलेल्या गुड नाईट गोल्ड फ्लॅश लिक्विडच्या ४५ एम एल च्या 30 सिल बॉटल एका बॉटलची किंमत ८० रूपये प्रमाणे एकुण २ हजार ४०० रूपये किंमतीचा बनावट माल स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता विक्रीसाठी ठेवून वरील नमुद कंपनीच्या कापी राईटच्या स्वामीत्वाच्या मुळ हक्काचे उल्लंघन केले.
याप्रकरणी नयनतारा भ्र डेव्हीड डेमी लिगल रिप्रझेंटीव्ह ऑफीसर बेंगलोर यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.९६/२०२५ कलम ५१,६३ कापीराईट अक्ट १९५७ चे सुधारित अधिनियम १९८४ अन्वये व्यंकटेश गिरीयाप्पा शेट्टीगार (रा.श्रीनगर कॉलनी बिदर रोड उदगीर) यांचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत.
0 Comments