Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगिरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला,पोलिसांसी संपर्क साधण्याचे उदगीर शहर पोलिसांचे आवाहन

उदगिरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला,पोलिसांसी संपर्क साधण्याचे उदगीर शहर पोलिसांचे आवाहन

उदगीर शहरातील अर्चना बारच्या बाजूला देशी दारूच्या दुकानासमोर नालीत एका ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना १६ जुलै रोज मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल जयराम पुठेवाड यांच्या माहितीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू १३/२४ कलम १९४ भारतीय न्याय संहिता नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अनोळखी व्यक्तीचे वर्णन

अनोळखी व्यक्तीचे वय ३५ वर्ष,रंग सावळा,उंची पाच फूट पाच इंच,केस काळे पांढरे, बांधा मजबूत, अंगात निळा लाल रंगाचे चौकडा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, उजव्या हातावर हनुमानाचे चित्र,U.S.असे गोंदलेले, उजव्या हातात पांढऱ्या धातूचे कडे,अशा वर्णनाचा व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला आहे.सदरील वर्णनाचा मृत व्यक्तीस कोणी ओळखत असेल किंवा कोणाच्या ओळखीचा असेल त्यांनी उदगीर शहर पोलीस स्टेशन येथील ०२३८५ २५६००३,पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांचा मोबाईल क्रमांक ९८७०४१५६३६ व पोलीस उपनिरीक्षक पी.डी.मोहिते यांच्या ९७६५९७१८१८या मोबाईल क्रमांकावर वर संपर्क साधण्याचे आवाहन उदगीर शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात