भाजपाच्या गटनेतेपदी मनोज पुदाले यांची निवड
उदगीर : नुकत्याच उदगीर नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या असून नगराध्यक्षपदी भाजपाच्या स्वाती सचिन हुडे या निवडून आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे उदगीर नगर परिषदेत नगराध्यक्षासह तेरा सदस्य निवडून आले असून भाजपाच्या वतीने नगरपरिषदेत आपल्या भूमिका मांडण्यासाठी भाजपच्या गटनेतेपदी भाजपचे माजी शहराध्यक्ष मनोज पुदाले यांची निवड केल्याचे पत्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे
भारतीय जनता पक्षाच्या एकूण 14 सदस्यामधून उदगीर नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष, स्थायी व विषय समिती निवडणूका, नामनिर्देशित सदस्यांच्या नियूक्त्या करणे, न.प. सभागृहात सर्वसाधारण / विशेष सभे मध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडून कामकाज पाहाणे व महाराष्ट्र स्थानीक प्रधिकरण सदस्य अनर्हता अधीनियम 1986 व महाराष्ट्र स्थानीक प्राधीकरण सदस्य अनर्हता नियम 1987 मधील तरतुधी नुसार काम करणे, अंमलबजावणी करण्यासाठी व पक्षनिर्देश (व्हीप) जारी करण्यासाठी श्री. पुदाले मनोज रामदास यांची उदगीर नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचा पक्ष प्रमुख (गटनेता) म्हणून निवड करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांना दिलेल्या पत्रात भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बस्वराज पाटील मुरूमकर यांनी म्हटले आहे.


0 Comments