उदगीरमध्ये मुंबई येथील २४ वर्षीय तरुणीवर लाॅजवर अत्याचार.एकाविरुध्द गुन्हा दाखल
उदगीर:मुंबई येथील एका २४ वर्षीय तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून उदगीर येथील डॉ झाकीर हुसेन चौक येथील एका लाॅजवर घेऊन जाऊन धमकी देऊन बळजबरीने अत्याचार केला. याप्रकरणी शनिवारी (१३ सप्टेंबर) पहाटे चारच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, ५ महिन्यापूर्वी दुपारी दोनच्या सुमारास शहरातील एका लाॅजवर आरोपीने पिडीत फिर्यादीस घेवून जावून मला तु खुप आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. असे म्हणाला. तेंव्हा फिर्यादीने आरोपीस नकार दिला असता, आरोपीने फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देवून बळजबरीने लैंगिक अत्याचार केला, तसेच केलेल्या अत्याचार संबंधाबाबत कोणाला सांगितले तर तुला खतम करून टाकतो, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरुन कलम ६४(१), ३५१(२), (३) भारतीय न्याय संहीता २०२३ नुसार किरण विठठल सुर्यवंशी, (वय ३२ वर्ष, रा.गुडसुर ता. उदगीर) याचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारु हे करीत आहेत.
0 Comments