उदगीर बसस्थानकात बसमध्ये चढताना सेवानिवृत्त शिक्षकाचे ५० हजार पळविले..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात बसमध्ये चढताना सेवानिवृत्त शिक्षकाच्या पँटच्या चोर खिशातून ५० हजार रुपये काढून घेऊन गेले. याप्रकरणी मंगळवारी २४ डिसेंबर दुपारी एकच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २३ डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात बसमध्ये चढताना फिर्यादी हा लातुर उदगीर बस मध्ये चढत असताना बस ला गर्दी असल्याने गर्दीचा फायदा घेवुन पॅन्टचे चोर खिश्यातील ५० हाजर रुपये कोणीतरी अज्ञात चोरटयांने चोरुन नेले आहेत.
याप्रकरणी सेवानिवृत्त शिक्षक बालाजी लक्ष्मण ढगे (रा. शिव नगर एस टी कालनी उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल पुठ्ठेवाड हे करीत आहेत.
0 Comments