उदगिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा
*उदगीर* : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उदगीर नगर परिषद निवडणूक 2025 च्या अनुषंगाने उदगीर शहरातील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपाई या युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.स्वाती सचिन हुडे व शहरातील २० प्रभागातील 40 उमेदवारांच्या प्रचारार्थ आज दि.२७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता, तालुका क्रीडा संकुल, जिल्हा परिषद मैदान, उदगीर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी क्रीडा मंत्री तथा उदगीर - जळकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे.
उदगीर शहराचा कायापालट करून उदगीर शहराला स्मार्ट शहर म्हणून महाराष्ट्रात नावारूपाला आणण्यासाठी उदगीर नगर परिषद ही युतीच्या ताब्यात असणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांना रस्ते , वीज , पाणी , आरोग्य या मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून शहराचा विकास करण्यासाठी युतीकडून उमेदवारी देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. आणि राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेस शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार संजय बनसोडे यांनी केले आहे.


0 Comments