Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांनी २५ मार्च पर्यंत EKYC करून घ्यावेत,तहसीलदार राम बोरगावकर

शेतकऱ्यांनी २५ मार्च पर्यंत EKYC करून घ्यावेत,तहसीलदार राम बोरगावकर

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर:तालुक्यात सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. उदगीर तालुक्यातील एकूण ४४०९४ पात्र शेतकऱ्यांसाठी ४७ कोटी १३ लाख ३६ हजार ३५६ रुपये शासकीय अनुदान वितरीत करण्यात आले असून यातील पात्र शेतकऱ्यांना DBT प्रणालीद्वारे अनुदान वितरणाची कार्यवाही पूर्ण झाली आहे.परंतु यापैकी ४०१३७ शेतकऱ्यांना ४३ कोटी ४२ लाख ४७ हजार रुपये वाटप करण्यात आले आहे.इकेवायसी पेंडिंग लाभार्थ्यांची संख्या ३१६१ असून २७,००६,९२८ रक्कम पोर्टलवर शिल्लक आहे. यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी VK लिस्ट (विशिष्ट क्रमांक) गावामध्ये डकविण्यात आलेली असून त्या VK नंबरसह शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवर जाऊन EKYC करून घ्यावे.यशस्वीपणे EKYC झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम उपलब्ध होईल.२५ मार्च २०२५ पर्यंत शेतकऱ्यांनी तातडीने EKYC करून घ्यावे अन्यथा लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही असे आवाहन तहसीलदार राम बोरगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात