Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

अवैध रित्या गोवंशाची वाहतूक करणारे चार वाहन ग्रामीण पोलिसांनी पकडले,चौघांवर गुन्हा दाखल

अवैध रित्या गोवंशाची वाहतूक करणारे चार वाहन ग्रामीण पोलिसांनी पकडले,चौघांवर गुन्हा दाखल

३१ बैलासह १५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

उदगीर:नळेगावं रोड मलकापूर जवळ ३१ गोवंशाची अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या चार वाहनांना ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून १८ मार्च रोज मंगळवारी सव्वा आकरा वाजेच्या सुमारास ताब्यात घेवून चार जणांवर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की  अवैध रित्या गोवंशाची वाहतूक करणारे चार वाहन उदगीरकडे येत असल्याची गुप्त माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती,मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उदगीर ग्रामीण पोलिसांनी उदगीर नळेगावं रोडवर मलकापूर जवळ सापळा रचून चारही वाहने ताब्यात घेऊन चौकशी केली असता, एपी २८ टीसी ८९८७ या क्रमांकाच्या आयशर टेम्पो मध्ये १७ बैल, एम.एच.२४ एयु ८७३२ मध्ये ३ बैल,एम.एच २४ एयु ५५८६ मध्ये ७ गोरे,एम.एच ५५ सी ०१६५ या मध्ये ४ बैल असे एकूण ३१ जणांवरे आढळून आली,आरोपीने संगनमत करून विनापरवाना बेकायदेशीरित्या गोवंश जातीच्या जनावरांना डांबून त्यांना क्रूरपणे व निर्दयीपणे वागणूक देऊन त्यांची वाहतूक केली, पोलीस नाईक बालाजी मारोती गारोळे यांच्या फिर्यादी वरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गोविंद नागप्पा धर्मा राहणार कामठाणा जि बिदर,मोहसीन महेबूब सयद राहणार वाढवणा ता उदगीर,हबीब हजू शेख राहणार नळगीर ता उदगीर, अक्षय नरसिंग सूर्यवंशी राहणार देवणी यांच्यावर  गुरंन १४९/२५ कलम ११ (१) (ड) प्राण्यास निर्दयीपणे वागविणे प्रतिबंध अधिनियम १९६० व मोटार वाहन कायदा कलम ६६ (१) १९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास  पोलीस हेडकॉन्स्टेबल तुडमे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात