*समाजातील सर्वसामान्य व्यक्तीला या भवनाचा उपयोग व्हावा : क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे*
*उदगीर शहरात उभारण्यात आलेल्या श्री गुरु हावगीस्वामी विरशैव लिंगायत भवनचे ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पण*
*उदगीर* : मतदार संघाचा सर्वांगीण विकास करुन सर्वजाती धर्माला न्याय दिला असुन मतदार संघात विविध समाजाची सभागृहे व प्रार्थना स्थळांना निधी दिला त्याचबरोबर प्रत्येक समाजाची मागणी लक्षात घेवुन भव्य - दिव्य भवनाची निर्मिती केली. या सर्व भवनाचा उपयोग समाजातील सर्वसामान्य व्यक्तीला व्हावा अशी भावना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर शहरात उभारण्यात आलेल्या श्री गुरु हावगीस्वामी विरशैव लिंगायत भवनाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी श्री.श्री.श्री. १००८ जगद्गुरु
ज्ञानसिंहासनाधिश्वर डाॅ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, गुरूवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर, गुरुवर्य डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराज, गुरूवर्य शांतीवीर शिवाचार्य महाराज, गुरूवर्य आचार्य गुरुराज महाराज अहमदपुरकर, गुरूवर्य बसवलिंग शिवाचार्य महाराज, गुरूवर्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज, गुरूवर्य चन्नमल्ल महास्वामीजी, शंकरलिंग शिवाचार्य महाराज, हावगीलिंग शिवाचार्य महाराज,विरुपात शिवाचार्य महाराज, सुखदेव स्वामी महाराज, किरण महाराज उदगीर, उमाकांत महाराज, माजी आ.धर्माजी सोनकवडे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, एल.डी. देवकर, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, चंद्रकांत वैजापुरे, सिद्धेश्वर पाटील, रमेश अंबरखाने, रामराव बिरादार, लक्ष्मीबाई पांढरे, उध्दव महाराज हैबतपुरे, अनिता हैबतपुरे, सुधीर भोसले, विजय निटुरे, शिवराज नावंदे गुरुजी, बालाजी भोसले, सय्यद जानीमियाँ, वसंत पाटील, शशिकांत बनसोडे, उत्तरा कलबुर्गे, सुभाष धनुरे, गिरीष उप्परबावडे, ओम पाटील, आशा रेड्डी, नवनाथ गायकवाड, गणेश गायकवाड,बाळासाहेब पाटोदे, कुणाल बागबंदे, विमल गर्जे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी,
डाॅ. शंभुलिंग शिवाचार्य महाराजांनी मनाचा मोठेपणा दाखवुन लिंगायत भवनसाठी जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे ही वास्तु उभारली आहे तर जंगम समाजाच्या मागणीचा विचार करुन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जंगम समाजासाठी श्री रेणुकाचार्य संस्कार भवनाचे काम प्रगतीपथावर असुन त्यासाठी २ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. चौकीमठासह
श्री गुरु हावगीस्वामी मठाला कोट्यावधीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. द्या श्री गुरु हावगीस्वामी मठाचा जीर्णेध्दार झाला आणि मठावर सोन्याचा कळस बसवण्यात आला ही बाब आपल्यासाठी सुवर्ण क्षण आहे. आपल्या मतांची किंमत ठेवुन २४ तास जनतेच्या सेवेसाठी काम केले. उदगीर व जळकोटसह
ग्रामीण व शहराचा सर्वांगीण विकास केला. मागील काळात मुलभुत व प्राथमिक गरजा पुरविल्या असुन आता मेडिकल काॅलेज, एम.आय.डी.सी., विमानतळ उभारणार असुन उदयगिरी बाबांच्या नावाने वंदे भारत रेल्वे सुरु करण्याचा माझा संकल्प आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.सिद्धेश्वर पटणे यांनी केले. यावेळी शहर व तालुक्यातील पदाधिकारी व नागरीक आणि महिला, भजनीमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments