देगलूर रोडवर मसाजच्या नावाखाली अवैध वेश्या व्यवसाय सुरू असताना पोलिसांनी टाकला छापा
उदगीर शहरातील देगलूर रोडवर एका बॉडी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असताना पोलिसांनी छापा टाकून तिघा आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देगलूर रोडवर पीटर इंग्लंड शर्ट दुकानाच्या वर असलेल्या द बेला स्पा अँड बॉडी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती,मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी मसाज सेंटरवर छापा टाकला असता आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे अमिष दाखवून देह व्याप्यारास प्रवृत्त करून सेंटरच्या नावाखाली कुंटनखाना चालवताना मिळून आले,व कुंटनखाना चालवण्यासाठी दोघा आरोपीने जागा उपलब्ध करून दिली.आयुब गफूरसाहब शेख दहशतवाद विरोधी शाखा लातूर यांच्या फिर्यादीवरून आरोपी संपती भगवान खुणे,गोपाळ माने राहणार लातूर, किरण संदीपान शिंदे राहणार तांबवा ता. केज जि. बीड यांच्यावर गुरंन ५४३/२४ कलम १४३,३ (५) भारतीय न्याय संहिता सह कलम ३,४,५,७ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ नुसार २ ऑक्टोबर रोज बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी हे करीत आहेत.
0 Comments