नागलगाव येथे दुचाकीने घरापर्यंत सोडले नसल्याने दगडाने मारहाण; दोघांविरुध्द गुन्हा
उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे एकाने दुचाकीवरून घरी सोडले नसल्याने दगडाने मारून जखमी केले. ही घटना शुक्रवारी २३ ऑगस्ट) सकाळी अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास नागलगाव बसस्थानक परिसरात आरोपीनी संगणमत करून फिर्यादीस तु तुझे मोटारसायकल वर आम्हाला आमच्या घरी सोड असे म्हणाले असता फिर्यादी याने मी तुम्हाला माझे मोटार सायकलवर सोडणार नाही असे सांगितले असता आरोपीतनी संगनमत करून फिर्यादीस शिवीगाळ केली व आरोपी लखन गणेश कांबळे याने हातात दगड घेवून दगडाने फिर्यादीचे डोकित मारून जखमी केले व आरोपी राहुल भानुदास कांबळे याने लाथाबुक्यानी मारहाण केली व तु जर आम्हाला तुझे मोटार सायकल वर घरी सोडला नाहीस तर तुला खतम करून टाकतो म्हणून जिवे मारण्याची धमकि दिली.
याप्रकरणी अनोज राजकुमार वाघमारे (रा.नागलगाव ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात राहुल भानुदास कांबळे, लखन गणेश कांबळे (दोघे रा. नागलगाव) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल शिरसे हे करीत आहेत.
0 Comments