Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मादलापूर येथे घरफोडी; रोख रक्कमेसह २ लाख १ हजार रुपयांचा ऐवज लंपास..

मादलापूर येथे घरफोडी; रोख रक्कमेसह २ लाख १ हजार रुपयांचा ऐवज लंपास..

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा..

उदगीर तालुक्यातील मादलापूर येथे एकाचे घराचे कुलुप कोंडा तोडुन घरातील रोख रक्कम ५० हजार व १ लाख ५१ हजार रुपयांची सोन्याची दागिने असे एकुण २ लाख १ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन घेऊन गेले आहे. याप्रकरणी बुधवारी ९ एप्रिल उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ८ एप्रिल च्या रात्री मादलापूर येथील सुनीता संजय गायकवाड यांचे घराचे कुलुप कोंडा तोडुन घरातील लोखंडी पेटीचे कुलुप कोंडा तुडुन ७५ हजार रुपयांची १४ ग्रॅमचे चार झुमके, ४५ हजाराचे८ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र गंठण, २१ हजार रुपयांची २ ग्रॅमचे कानातील वेल व १ ग्रॅमचे गळ्यातील पान, १० हजार रुपयांची २ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, व रोख ५० हजार रुपये, असे रोख रक्कमेसह एकुण २ लाख १ हजार रुपयांचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून घेवून गेले आहे.याप्रकरणी सुनीता संजय गायकवाड  यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.१८९/२०२५ कलम ३०५, ३३१ (३), ३३१(४), भारतीय न्याय संहिता २०२४ नुसार अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात