उदगीर:येथील रहिवासी असलेली अँड.कु शिवानी सुनिल हावा हि २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या आँल इंडिया बार एग्झामिनीशन मध्ये विशेष प्राधान्यासह उत्तीर्ण झाली आहे.कु.शिवानी सुनिल हावा हि २०२३ मध्ये उदगीर येथील संत तुकाराम विधी महाविद्यालयात एल.एल.बि परीक्षा देऊन लातूर जिल्ह्यात विशेष प्राधान्यात उत्तीर्ण झाली होती.तीचे शालेय शिक्षण १० वी पर्यंत संग्राम स्मारक विद्यालय येथे तर १२ वी चे शिक्षण शिवाजी महाविद्यालयात झाले.तसेच बी.ए.चे शिक्षण हावगिस्वामी महाविद्यालयात झाले आहे.१२ वीत शिक्षण घेत असताना लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये डी.एम.एल टी लँब टेक्निशियनचा डिप्लोमा पूर्ण केला.अँड.कु शिवानी सुनिल हावा हि अत्यंत हालाकिच्या परीस्थितीत शिक्षण घेऊन आँल इंडिया बार एग्झामिनीशन उतिर्ण झाल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.अँड.शिवानी हावा हि उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे सचिव,स्टार दर्पण न्युज चॅनेल व साप्ताहिक बसव-रत्नचे संपादक श्री.सुनिल बस्वराज हावा यांची कन्या असून सध्या उदगीर जिल्हा सत्र न्यायालयात प्रँक्टिस करीत आहे.
0 Comments