जळकोट रोडवर सिनेस्टाईल मारहाण करणाऱ्या सहा तरुणावर गुन्हा दाखल
उदगीर शहरातील जळकोट रोडवर दोघा तरुणास सिनेस्टाईल मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात २३ मार्च रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सहा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत अधिक माहिती अशी की घटना २२ मार्च रोज शनिवारी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास जहागीरदार कॉम्प्लेक्स समोर जळकोट रोडवर फिर्यादी व फिर्यादीच्या मित्राने गाडीला कट का मारली असे विचारले असता तुला काय करायचे आहे असे म्हणून आरोपीने संगनमत करून शिवीगाळ करीत फिर्यादीस दगडाने मारून जखमी केले व फिर्यादीच्या मित्रास हातातील लोखंडी कड्याने डोक्यात मारून जखमी केले,व जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी संगमेश्वर धनराज बिरादार वय २३ वर्ष राहणार नावंदी ता उदगीर यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी शैलेश पाटील,आदित्य संजय कांबळे,अजय बंडू सोनकांबळे, विक्की काकरे, अभय केंद्रे,आशिष वाघमारे, यांच्यावर गुरंन १५६/२५ कलम ११८ (१) ११५ (२) ३५२,३५१ (२) १८९ (२) १९१ (२) १९० भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर पडिले हे करीत आहेत.
0 Comments