उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकारच्या दाखल्याचे वितरण
उदगीर:शहरातील बनशेळकी रोड येथे मसनजोगी वस्तीत उदगीर तहसील कार्यालयाच्या वतीने भटक्या विमुक्त जाती व जमाती मधील वंचित व गरजू लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरिता बनशेळकी परिसरात विशेष शिबीर घेवून विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तहसीलदार राम बोरगावकर,नायब तहसीलदार सोनवणे,नायब तहसीलदार श्रीमती राजश्री भोसले,पुरवठा निरीक्षक अधिकारी सुमित्रा ईलमले मॅडम,मंडळ अधिकारी शंकर जाधव,तलाठी पंकज कांबळे,यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments