ईदगाह मैदानावर मंडप टाकण्याची जन परिवर्तन सेवा संघाची मागणी...
उदगीर:पवित्र रमजान ईद निमित्त उदगीर येथील ईदगाह मैदानावर ईद उल फित्रची नमाज पडण्यासाठी मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने समाज बांधवांना नमाज पडताना उन्हाचा त्रास होणार आहे. त्यामुळे संपूर्ण मैदानावर मंडप टाकण्याची मागणी जन परिवर्तन सेवा संघाच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक सोमनाथ उषा भगवान जाधव यांच्याकडे करण्यात आली. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शहरातील वराह या जनावरांवर पायबंद करणे व शहरातील मुस्लीम समाजाच्या सर्व स्मशान भूमीची साफसफाई करण्याचीही मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जनपरीवर्तन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अझरोद्दीन शमशोद्दीन शेख ,खुरेशी शफी,सय्यद वासिफ अकमल,पठाण अमिर, हाश्मी सय्यद शोएब,जुबेर मोहसीन सय्यद,पठाण खाजा,शेख उमर मुजमील,सय्यद असलम यांची उपस्थिती होती.
0 Comments