Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मतदानासाठी पैसे देणाऱ्या तिघांवर तर पैसे घेणाऱ्या दोघां महिलेवर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मतदानासाठी पैसे देणाऱ्या तिघांवर तर पैसे घेणाऱ्या दोघां महिलेवर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उदगीर:मतदानासाठी पैसे वाटप करणाऱ्या तिघांवर व पैसे घेणाऱ्या दोघां महिलेवर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की १) संदीप वैजिनाथ फड २) प्रशांत देविदास राठोड ३) तीरुपती माधव केंद्रे सर्व रा.हकनकवाडी ता.उदगीर तर मतदानाचे पैसे घेणाऱ्या १) पारुबाइ गंगाराम राठोड २) ललीता नामदेव राठोड दोन्ही रा.राठोड तांडा येथे १८ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गंगाराम मेंदु राठोड यांच्या घरासमोर राठोड तांडा या ठिकाणी तिघा आरोपीतांनी संगणमत करुन घडयाळ या पक्षाला मतदान करण्यासाठी पैसे वाटप करीत होते.आरोपीला विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता लागु असल्याचे माहीत असतानाही मतदाराला घडयाळ यास मत देण्याकरीता लाच देत होते.यावेळी दोन मतदार महिलांनी लाच स्विकारुन अचार संहितेचा भंग केला आहे.व्यंकटेश रघुनाथ दंडे विस्तार अधिकारी यांच्या फिर्यादी वरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरंन १०५८/२४ कलम १७३,३ (५) भारतीय न्याय संहिता नुसार १९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक कदम  हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात