लोहारा येथे मैत्री धाब्यावर प्लास्टिक खुर्चीच्या मारहाणीत एकजण गंभीर; चौघांविरुध्द गुन्हा..
उदगीर तालुक्यातील लोहारा शिवारात असलेल्या मैत्री धाब्यावर मागील भांडणांची कुरापत काढून प्लास्टिक खुर्चीने मारहाण करुन एकाला गंभीर जखमी केले. याप्रकरणी रविवारी (१७ नोव्हेंबर) उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान पंडित बनसोडे (रा.लोहारा ता. उदगीर) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१६ नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास लोहारा शिवारात असलेल्या मैत्री धाब्यावर आरोपीनी संगणमत करुन फिर्यादीस मागील भांडणाची कुरापत काढुन, शिवीगाळ करुन, लाथाबुक्याने मारहाण करुन, व फिर्यादीचे डोकीत, पाटीत, खुब्यावर व उजवे हातावर प्लास्टीकची खुर्ची मारुन जखमी केले व तु जर आमचे नादाला लागलास तर तुला खतम करून टाकतो असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी भगवान पंडीत बनसोडे (रा. लोहारा ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अमोल कांबळे, अनिल कांबळे, बंटी कांबळे, पमा कांबळे (सर्व रा. लोहारा ता. उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल भिसे हे करीत आहेत.
0 Comments