Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

बावीस गोवंशाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर वाढवणा पोलिसांनी पकडला

बावीस गोवंशाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर वाढवणा पोलिसांनी पकडला

१४ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त तिघांवर गुन्हा दाखल

उदगीर तालुक्यातील सुकणी जवळ अवैधरित्या २२ गोवंशाची वाहतूक करणारा कंटेनर वाढवणा पोलिसांनी पकडून १४ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे, याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात ३१ मे रोजी तिघावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती आरोपींने कंटेनर क्रमांक केए ३८ ए ७२६५ मध्ये मुक्या प्राण्यांना वेदना,यातना होतील आशा रीतीने अरुंद जागेत व आखूड दोरीने बांधून दाटीवाटीने २२ गोवंश जातीच्या बैलांना चारापाणी न करता क्रूरपणे डांबून कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर रीत्या वाहतूक करताना ३१ मे रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या दरम्यान सुकणी गावाजवळ मिळून आले.याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पंडितराव दळवे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पुंडलिक सिताराम बिरादार राहणार हंचनाळ ता.देवणी,अनिल व्यंकट भोई राहणार मलखेड ता हुमनाबाद जि गुलबर्गा,नागेश शरणअप्पा भोई राहणार हळीखेड ता हुमनाबाद जि गुलबर्गा यांच्यावर गुरंन १५४/२५ कलम (अ) ५ (ब) ९,११ महाराष्ट्र पशु संरक्षण सुधारणा अधिनियम १९७६ सह कलम ११ (१) (ड) (ई) प्राण्यास निर्दयतेणे वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६० सह कलम ६६ (१) १९२ मोटार वाहन अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवप्रताप रंगवाळ हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात