पिंपरी शिवारात विजेचा शाॅक लागून मृत्यू प्रकरणी; शेतीत विज प्रवाह सोडणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा..
उदगीर तालुक्यातील पिंपरी शिवारात रानडुक्करापासून बचाव व्हावा म्हणून उसाच्या फडात लावलेल्या विद्युत प्रवाहाचा शाॅक लागुन जनावरे चारत असलेल्या शेतमजूराचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी (२६ ऑगस्ट) सायंकाळी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात शेतीत विज प्रवाह सोडणाऱ्या शेतकऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पिंपरी शिवारातील शेतीत शेतकऱ्याने रानडुक्करापासून बचाव व्हावा म्हणून उसाच्या फडात चौहुबाजूने हयगयी व निष्काळजीपणे लाईटचे वायर टाकून त्यात वीज पुरवठा सोडल्याने गायी व म्हशी चारवत असताना यातील फिर्यादीचे वडील हे विजेचा धक्का लागून मयत झालेले आहेत. फिर्यादीचे वडीलांच्या मरणास शिवाजी पांडूरंग खराबे हे कारणीभुत झाले आहेत.
याप्रकरणी शिवशंकर गुरुनाथ बिरादार (रा पिंपरी ता उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवाजी पांडूरंग खराबे (रा पिंपरी ता. उदगीर) या शेतकऱ्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाॅस्टेबल शिरसे हे करीत आहेत.
0 Comments