Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

श्रीक्षेत्र हत्तीबेट येथे आमदार संजय बनसोडे यांचा साखर तुलाभाराने सन्मान

श्रीक्षेत्र हत्तीबेट येथे आमदार संजय बनसोडे यांचा साखर तुलाभाराने सन्मान

उदगीर तालुक्यातील देवर्जन येथील श्रीक्षेत्र हत्तीबेट येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उदगीरचे आमदार तथा राज्याचे माजी मंत्री संजय भाऊ बनसोडे यांची साखर तुलाभार करून गौरव करण्यात आला.
श्रीक्षेत्र हत्तीबेटाच्या विकासासाठी आमदार संजय बनसोडे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याने देवर्जन व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. या भावनिक आणि भक्तीमय सोहळ्यात साखर तुला करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास देवर्जन सह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, स्थानिक ग्रामस्थ व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत भव्य आणि भावनिक वातावरणात पार पडला. याप्रसंगी हत्तीबेटावरील गंगानाथ महाराज व स्वामी समर्थ महाराजांचे आमदार मोहदयांनी दर्शन घेतले.
श्रीक्षेत्र हत्तीबेट हा भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र असून, येथील विकासासाठी आमदार संजयभाऊ बनसोडे यांनी दिलेल्या निधीमुळे भविष्यात धार्मिक पर्यटनाला मोठा चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. तसेच, हा उत्सव यापुढेही अधिक मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला.

Post a Comment

0 Comments

जाहिरात