आरोग्यदुत डॉ.माधव चंबुले यांच्या वाढदिवसानिमित्त अतनुरात वृक्षारोपण
जळकोट:सर्वसामान्या गोरगरिब कुटुंबातील सर्व समाजाप्रती महिलांमध्ये राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व आरोग्याविषयी जाणीवाजागृती, जणजागरण करून त्यांना अनेक अनिष्ट चालीरितीतून बाहेर काढुन एका आदर्श समाज उभारणीसाठी आजच्या आधुनिक काळातही अनेक आरोग्यदुत तथा देवदुत कार्यरत आहेत. त्यापैकी एक आहेत. समाजसेवावृत्तीचे डॉ.माधव वीरप्पा चंबुले होयत. त्यांनी उदगीर शहरातील सर्वसामान्य रूग्णांना, पुरूष व महिलांना विविध व्याधीच्या शस्त्रक्रियेतून मुक्ती देण्यासाठी पहिले उदयगिरी व साई हॉस्पिटल ची निर्मिती प्रसिद्ध समाजसेवावृत्तीचे आरोग्यदुत डॉ.माधव वीरप्पा चंबुले यांनी शेल्हाळ रोड, कल्पना टॉकीज जवळ सुसज्ज असे उदयगिरी मल्टीस्पेशलिटी व अपघात हॉस्पिटल व साई हॉस्पिटल या नावाने उदगीर शहराच्या काही अंतरावर आंध्रप्रदेश-तेलगना-कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती भागातून व परिसरातील तालुक्यातून येणाऱ्या गोरगरीब, दिन-दलित, पददलित, आठरापगड जातीधर्मातील रूग्णांच्या अखंडित सेवेला अल्पदरात किवा मोफत सर्वरोग निदान शिबीराअंतर्गत उदयगिरी किवा साई हॉस्पिटलचा आधार मिळावा म्हणून हॉस्पिटलची निर्मिती केली. या हॉस्पिटलच्या अंतर्गत मुंबई, पुणे, हैद्राबाद, औंरगाबाद सारख्या फाईवस्टार हॉस्पिटलला होणाऱ्या महागडया शस्त्रक्रिया येथे समाजसेवावृत्ती देवदुत डॉ.माधव वीरप्पा चंबुले यांच्या वतीने हर्निया, हायड्रोसील शस्त्रक्रिया माफक दरात तर सर्वरोग निदान शिबीराअंतर्गत निशुल्क मोफत केले जातात.हे विशेष आहे.आज दि.१ जून रोजी आरोग्यदुत समाजसेवावृत्तीचे डॉ.माधव वीरप्पा चंबुले यांचा वाढदिवस यानिमित्ताने अतनूर ता.जळकोट येथे संजीवनी समाधी घेणारे श्री.घाळेप्पा स्वामी महाराजांच्या समाधीस व श्री.काशीविश्वनाथ महाराजांच्या मुर्तीस आभिषेक, पुजा, अर्चा, वृक्षारोपण, वृक्षलागवड व संगोपन तसेच साई हॉस्पिटल येथे रूग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. असे जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूरचे संस्थापक प्रदेशअध्यक्ष बी.जी.शिंदे, पत्रकार संजय शिंदे, पत्रकार बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, साई डेंन्टल हॉस्पिटलचे डॉ.सुशिलकुमार चंबुले, डॉ.सौ.पुजा चंबुले-चामले, डॉ.संदीप नादरगे यांनी सांगितले.
0 Comments