Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर शहर पोलीस ठाण्याला नवे नेतृत्व; पोलीस निरीक्षक विरप्पा भूमनूर रुजू

उदगीर शहर पोलीस ठाण्याला नवे नेतृत्व; पोलीस निरीक्षक विरप्पा भूमनूर रुजू

सूत्रे हाती घेताच ऐतिहासिक किल्ल्यातील उदागिर बाबांचे दर्शन; मठ संस्थानकडून सत्कार

उदगीर, प्रतिनिधी :
 उदगीर शहर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून विरप्पा भूमनूर यांनी पदभार स्वीकारला असून,उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सूत्रे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी हाती घेतली पोलीस निरीक्षक विरप्पा भूमनूर रुजू झाल्यानंतर त्यांनी तात्काळ शहरातील धार्मिक व ऐतिहासिक वारशाला अभिवादन करत उदगीर येथील ऐतिहासिक किल्ल्यातील उदागिर बाबांचे दर्शन घेतले. त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
नव्या जबाबदारीची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे संकेत त्यांनी दिले. यावेळी मठ संस्थानचे मठाधिश जयशगिर गुरू सतीशगिरी महाराज,पुजारी किरण महाराज, सोनू महाराज, विजय विराज चिखले,प्रकाश तानशेट्टे,श्रीधर सावळे,राजू स्वामी,विशाल वारकरे,अमर कासराळे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
उदगीर शहरात वाढती वाहतूक, नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न, गुन्हेगारीवर नियंत्रण तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी नव्या पोलीस निरीक्षकांवर असणार आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन अधिक प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
शहरातील विविध सामाजिक, धार्मिक व व्यापारी संघटनांनीही नव्या पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीचे स्वागत केले असून, पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
उदगीरकरांचे लक्ष आता नव्या पोलीस निरीक्षकांच्या कार्यशैलीकडे लागले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, गतिमान व लोकाभिमुख होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात