विध्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करणाऱ्या शिक्षिका संपूर्णा सुधीर पारसेवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
उदगीर:शहरातील शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या, आपल्या ज्ञानाने आणि संस्कारांनी पिढ्या घडविणाऱ्या शिक्षिका संपूर्णा सुधीर पारसेवार यांचे ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने शाळा, विद्यार्थी आणि संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.त्या केवळ एक शिक्षिका नव्हत्या, तर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक,प्रेरणास्थान आणि आधारवड होत्या. त्यांनी आपल्या सेवाकाळात असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चांगले संस्कार दिले. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत.संपूर्णा सुधीर पारसेवार ह्या उदगीर येथील मॉडेल इंग्लिश स्कुलच्या स्थापनेपासून सलग विस वर्ष अविरतपणे सेवा बजावल्या त्यानी संस्थेला दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.त्यांच्या निधनाची बातमी समजताच मॉडेल इंग्लिश स्कुलचे संस्थापक सत्यवान भोसले, माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक आणि पालकांनी हळहळ व्यक्त केली. “त्यांच्यासारखी शिक्षिका पुन्हा होणे कठीण आहे,” अशा भावना सत्यवान भोसले यांनी व्यक्त केल्या.त्यांच्या स्मरणार्थ शाळेत शोकसभा आयोजित करण्यात आली असून, त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.त्यांच्या दुःखद निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,हीच सर्वांची प्रार्थना.


0 Comments