उदगिरात एकाची ४९ लाख रुपयांची फसवणूक; दोघांविरुध्द गुन्हा
निडेबन येथील एकाला कविता चित्रपटात घेतो म्हणून रक्कम रुपये ४८,९५,९६५ रुपये काढून घेतले. याप्रकरणी शुक्रवारी (६ जून) रात्री सातच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १९ सप्टेंबर २०१७ ते ३ नोव्हेंबर २०२० या कालावधीत संशयित आरोपीनी संगणमत करून निडेबन येथील शिक्षक नामे शिवाजी धनसिंग राठोड यांना संशयित आरोपी नामे राजेश भगवान पवार (रा.चोळी तांडा पोस्ट गौळ ता.कंधार जि नांदेड) यांनी शिक्षकास कवीता चित्रपटात घेतो व चित्रपटात भूमीका देतो व फिल्म इंडस्ट्री मध्ये सदस्य पद देतो असे म्हणून बनावट प्रमाणपत्र दिले व तूम्हाला पूरस्कार देतो असे म्हणून वारंवार खोटे अमीष दाखवून माझा विश्वास घात करून माझे कडून रोख स्वरूपात २६ लाख ४४ हजार ३१ रुपये व ऑनलाईन स्वरूपात २२ लाख ५१ हजार ९३४ रूपये असे एकूण ४८ लाख ९५ हजार ९६५ रूपयांची फसवणूक केली व पैसे आज देतो उदया देतो असे म्हणून आज पावेतो पैसे दिले नाहीत व पैसे मागीतले असता शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार शिवाजी धनसिंग राठोड (वय ५५ वर्षे, व्यवसाय शिक्षक रा.निडेबन ता.उदगीर) यांनी दिल्यावरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४०६, ४१६, ४२०, ४७१, ५०४, ५०६, ३४ भादवि प्रमाणे राजेश भगवान पवार (रा.चोळी तांडा पोस्ट गौळ ता.कंधार जि नांदेड) गूप्ता साहेब (रा.माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.
0 Comments