उदगिरात ईद - उल - अजहा उत्साहात..
उदगीर शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सामुहिक नमाज अदा करून ईद - उल - अजहा (बकरी ईद) उत्साहात साजरी केली़. नमाजचे पठण मौलाना मुफ्ती सय्यद मुश्ताक अहेमद खतीब यांनी केले.
सामूहिक नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या़. त्यानंतर ठिकठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत जाऊन आपल्या पूर्वजांच्या समाधीवर पुष्प अर्पण केले़ ईद - उल - अजहा निमित्त मुस्लिम बांधवांनी शासनाने दिलेल्या नियम व अटीचे बंधन पाळून
कुर्बानी दिली. ईदगाह मैदानावर शहरातील विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावून मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 Comments