श्रीराम नवमी निमित्त उदगीर शहरातील मटण दुकाने बंद ठेवण्याचा मुस्लिम खाटीक समाजाचा निर्णय
उदगीर:श्रीराम नवमी हिंदू बांधवांनी देशभर मोठ्या उत्साहात साजरी करतात श्रीराम नवमी दिवशी उदगीर शहरातील सर्व मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय उदगीर शहरातील मुस्लिम खाटीक समाज बांधवांनी एकत्र बसून घेतला,उदगीर शहरातील सर्व मटण दुकाने ६ एप्रिल रोजी बंद ठेवणार असल्याचे खाटीक समाजाचे अध्यक्ष जमाल खुरेशी यांच्या स्वाक्षरीने विनंती अर्ज ५ एप्रिल रोज शनिवारी उदगीर शहर पोलीस निरीक्षकांची भेट घेवून देण्यात आले,यावेळी मुस्लिम खाटीक समाज बांधवांने घेतलेल्या निर्णयांचे पोलीस प्रशासनाने अभिनंदन केले.
0 Comments