उदगिरात एकाचा खून,दोघा आरोपीवर खूनाचा गुन्हा दाखल
उदगीर शहरातील शेतकी निवास परिसरात एकाचा खून केल्याची घटना २१ नोव्हेंबर रोज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात २१ नोव्हेंबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास दोघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील शेतकी निवास परिसरात वाघमारे यांच्या देशी दारूच्या दुकानासमोर आरोपीने मोबाईल घेतल्याच्या कारणावरून गौस नूरमहमद पठाण वय ५५ यास लाथा बुक्क्याने मारहाण करून जीवे ठार मारले मयताची पत्नी आयशा गौस पठाण वय ४० वर्ष यांच्या फिर्यादी वरून आरोपी पठाण अलबक्ष नबीसाब,व जमीर यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुरंन ३०७/२४ कलम १०३ (१),३ (५) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.
0 Comments