Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी एकूण २५ टेबलावर होणार,मोबाईल नेण्यास बंदी

उदगीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी एकूण  २५ टेबलावर होणार,मोबाईल नेण्यास बंदी

उदगीर:नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार असून सकाळी ८ वाजल्या पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.उदगीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उदगीर देगलूर रोडवरील कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मतदानाची मतमोजणी होणार असून एकूण २५ टेबलाचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी १४ टेबलावर EVM यंत्रातील मतमोजणी करण्यात येणार आहे, तर ९ टेबल टपाली मतपत्रिकासाठी तसेच २ टेबल ETPBS द्वारे मतमोजणी साठी असतील. प्रत्येक टेबलावर सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक नेमण्यात आले आहेत.२६ फेरीमध्ये मतमोजणी संपन्न होईल साधारणतः मतमोजणी कामी ३२५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सदर मतमोजणी केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून ओळखपत्र प्राप्त व्यक्तीना,अधिकारी कर्मचारी यांनाच प्रवेश असेल. सुरक्षाकामी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवारांना जास्तीत जास्त २५ मतमोजणी प्रतिनिधी नेमता येतील याशिवाय कोणीही अनधिकृत व्यक्तींना मतमोजणी कक्षात प्रवेश असणार नाही. मतमोजणी केंद्राबाहेरील वाहतूक व्यवस्थापन पोलिसांकडून करण्यात येणार आहे. मुख्य प्रवेशद्वारावरूनच आत मध्ये ओळखपत्र तपासून पोलीस प्रवेश देतील. पत्रकारांसाठी बैठकीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल फोन,इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याकामी सर्व उमेदवार, उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी, उमेदवारांनी नियुक्त केलेले मतमोजणी प्रतिनिधी, पत्रकार यांनी भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याचे  उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात