Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

एसटी कॉलनी येथे झालेल्या घरफोडीतील ४ गुन्हेगारांना ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एसटी कॉलनी येथे झालेल्या घरफोडीतील ४ गुन्हेगारांना ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उदगीर; शहरातील एसटी कॉलनी  दिवसा ढवळ्या घरफोडी करणाऱ्या चार चोरट्यांना उदगीर ग्रामीण पोलिसांनी ४८ तासाच्या आत घरफोडीचा तपास लावून ४ चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की एसटी कॉलनी उदगीर येथे चोरट्यांने दिवसा बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम पळवून नेली होती.याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरंन ६६३/२४ कलम ३०५(अ) ३३१ (३),३ (५) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्यातील आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून आरोपींची ओळख पटवून सदर गुन्ह्यातील आरोपी राम दगडू गरगेवाड मळवटी रोड सिद्धेश्वर नगर लातूर,आकाश उर्फ भावड्या बाबुराव कांबळे सिद्धेश्वर नगर लातूर,रोहन विक्रम बनसोडे संत गोरोबा सोसायटी विवेकानंद चौक लातूर,खाजा यासीम सय्यद इकबाल चौक लातूर यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंढे,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे,पोलीस उपअधीक्षक मनीष कल्याणकार यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या नेतृत्वात डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे,पोलीस हवालदार राम बनसोडे ,सखाराम भिसे,पोलीस नाईक संदीप केंद्रे,पोलीस अंमलदार सचिन नाडागुडे,नामदेव चेवले यांनी विशेष कामगिरी बजावली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात