चोंडी येथे शिक्षण परिषद संपन्न,चोंडी केंद्रातील शिक्षकांना दिले प्रशिक्षण
उदगीर:तालुक्यातील चोंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २७ सप्टेंबर रोज शुक्रवारी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.चोंडी केंद्रात असलेल्या सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षिका या शिक्षण परिषदेला उपस्थित होते.शिक्षण परिषदेची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली.यावेळी केंद्रप्रमुख विजयकुमार चव्हाण यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार मोरखंडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी पवार आदी उपस्थित होते.
0 Comments