नामदार संजय बनसोडे यांच्या विजयाचा अतनूर, चिचोंली, गुत्ती गावात मोठा जल्लोष
उदगीर - जळकोट विधानसभा निवडणुकीत महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विधमान आमदार, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला असुन अतनूर गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अप ) गटाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, शिवसेनेचे जिल्हा सरचिटणीस विकास दादा सोमुसे-पाटील, माजी सैनिक आयुब शेख, इस्माईल मुंजेवार, गणेश गायकवाड, युवा कार्यकर्ते विकास पाटील, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुर्यकांत पांचाळ, उपाध्यक्ष ईश्वर कुलकर्णी, कैलास पाटील, उपसरपंच बाबूराव कापसे, गव्हाण चे उडते, मेवापूरच्या सरपंच सौ.कोमल तुळशीदास पाटील, सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास पाटील, अमोल गायकवाड, चिंचोलीच्या सरपंच सौ.रेखा बिरादार, उपसरपंच राजेंद्र बंडरे, माजी सरपंच संतोष निवृत्ती बट्टेवाड, दतात्रेय गिरी, उपसरपंच राजेंद्र बंडरे, बिरादार, गव्हाणे, पाटील, गायकवाड, गव्हाणे, शाम हुंजे, प्रमोद संगेवार , चंद्रकांत गायकवाड, मेवापूरचे उपसरपंच गौतम गायकवाड, सदस्य पोर्णिमा अमोल गायकवाड, पंढरी देवकते, दहीकांबळे, दस्तगीर शेख, आतनुरचे शिंदे, मुंजेवार, शेख, आतार, गव्हाणे-पाटील, सोमुसे, पाटील, गायकवाड, कांबळे, बारसुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा नेते यादवराव विनायकराव केंद्रे, हनुमंत पाटील, नामदेव बापूराव केंद्रे, सटवाजी ज्ञानोबा केंद्रे, नामदेव बंदुके, सोपान बंदुके, विष्णू केंद्रे, रामराम देऊळवाडे, गौतम सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, संग्राम सूर्यवंशी, शिवा केंद्रे, संभाजी केंद्रे, विठ्ठल सुतार, केशव केंद्रे, मंगेश घुले, आप्पाराव घुले, विश्वनाथ केंद्रे, बंदुके, व्यंकटराव बंदुके, व्यंकट मुंडे, रावजी केरबा केंद्रे, नरहरी केंद्रे, गणेश पाचके, अनंतराव सातपुते, मधुकर सातपुते, प्रदीप सूर्यवंशी, संग्राम केंद्रे, विक्रम केंद्रे, विक्रम केंद्रे, गुत्तीच्या सरपंच सौ.मीनाताई यादवराव केंद्रे, उपसरपंच गोविंद राठोड, युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य यादव विनायकराव केंद्रे, व्यंकटराव मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणाच्या समोर, श्री.काशी विश्वनाथ महाराज मंदिर प्रांगणाच्या समोर, संजीवन समाधी स्थळ श्री.घाळेप्पा स्वामी मठ संस्थान प्रांगणात, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती संभाजी राजे महाराज चौक, मुख्य मेन रोड रस्ता, व्यापारी बाजारपेठे समोर फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. विजयाचा पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. या विजयामुळे पुन्हा एकदा अतनूर परिसरा मध्ये महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना, भाजपचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप), उबाठा शिवसेना पक्ष, राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षांचे उमेदवार, दहा वर्षे भाजपाचे आमदार असलेले माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा मोठ्या मताधिक्याने दारुण पराभव केला. असून याच आनंदात अतनूर, चिचोंली, मेवापूर, गव्हाण, शिवाजीनगर गावातील अ.प.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, शिवसेना शिंदे गटाचे, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यांची उपस्थिती होती.
0 Comments