उदगिरात एकाचा अपहरण; ३ अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा..
उदगीर शहरातील देगलूर रोड वरील बँक ऑफ इंडिया समोरुन एकाला तीन अनोळखी व्यक्तीनी अपहरण करुन घेऊन गेले आहे. याप्रकरणी रविवारी (२४ नोव्हेंबर) सायंकाळी चारच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवि शिवनाथ फताटे (वय ३३ वर्षे व्यासाय : नौकरी मेडीकल कालेज सोलापुर हा.मु. महादेव रेसीडेन्सी निडेबन रोड उदगीर) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान शहरातील देगलूर रोड वरील बँक ऑफ इंडिया समोरुन अनोळखी तीन आरोपीनी संगनमत करून फिर्यादीचे मूलास पळवून घेऊन गेले.
याप्रकरणी शिवनाथ देवराव फताटे (रा. नावंदी ता. उदगीर जि. लातुर हा. मु. महादेव रेसीडेन्सी निडेबन रोड उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०९/२०२४ कलम १४०(३), ३(५) बी.एन.एस. प्रमाणे तीन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहिते हे करीत आहेत.
0 Comments