उदगीर लातूर रोडवर इनोव्हा कार चालकाने स्विफ्ट डिझायर कारला धडक देवून ५० हजारांचे केले नुकसान
उदगीर लातूर रोडवर महाजन वेअर हाऊस समोर इनोव्हा कार चालकाने स्विफ्ट डिझायर कारला पाठीमागून धडक देऊन ५० हजारांचे नुकसान केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात १५ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत अधिक माहिती अशी की उदगीर लातूर रोडवर महाजन वेअर हाऊस समोर १२ जून रोजी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास इनोव्हा कार क्रमांक एम एच २४ ए एस २५५५ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील कार हयगय व निष्काळजीपणाने चालवून डीवायडरला जोराची धडक दिली यात इनोव्हा कार पलटी होऊन समोर जात असलेल्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच १२ जेसी १५४६ ला पाठीमागून धडक देऊन ५० हजारांचे नुकसान केले व इनोव्हा कार मध्ये बसलेले सचिन काशिनाथ माडगूळे वय ३३ वर्ष राहणार लखनगाव ता भालकी यांच्या मरणास कारणीभूत झाला तर अश्विन बालाजी सोनकवडे,संकेत प्रभाकर सोनकवडे यांच्या व स्वतः गंभीर जखमी होण्यास कारणीभूत ठरला आहे याप्रकरणी नवीन काशिनाथ माडगूळे यांच्या फिर्यादी वरून इनोव्हा गाडीचे चालक आश्लेष बालाजी सोनकवडे यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरंन ३७०/२५ कलम १०६(१) २८१,१२५(A) १२५ (B) ३२४ (२) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते हे करीत आहेत
0 Comments