Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर शहरात ध्वनिक्षेपक वाजविणाऱ्यावर पोलीस प्रशासनाची कार्यवाही सुरू

उदगीर शहरात ध्वनिक्षेपक वाजविणाऱ्यावर पोलीस प्रशासनाची कार्यवाही सुरू

उदगीर : शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलली असून, ध्वनीक्षेपकांचा वापर करून फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात शांतता प्रस्थापित होण्यास मोठी मदत होईल. पोलीस निरीक्षक दिलिप गाडे ऍक्शन मोडमध्ये येत शहरातील प्रमुख रस्ते व बाजारपेठांमध्ये अचानक तपासण्या सुरू केल्या आहेत. ध्वनीक्षेपक लावून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना प्रथम समज देण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन कायम ठेवल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा सक्त सूचना दिल्या आहेत.पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे शाळा, रुग्णालये व निवासी भागांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांना विश्रांतीसाठी शांत वातावरण उपलब्ध होण्यास मदत होईल.पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “ध्वनीप्रदूषण टाळणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.”
दरम्यान, या उपक्रमाचे शहरातील विविध स्तरांतून स्वागत होत आहे. “उदगीर शहरात शिस्त आणि शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची ही मोहीम अत्यंत प्रभावी ठरणार आहे.एकूणच पोलीस प्रशासनाच्या या निर्णायक भूमिकेमुळे उदगीर शहरात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले गेले असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात शांततेची नवी चाहूल लागली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात