तुळजापूर मार्गावर झालेल्या ट्रॅव्हल्स अपघाताची चौकशी करून चालक व मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा
उदगीर:तुळजापूर मार्गावर आशिव पाटी जवळ पुण्यावरून उदगीरकडे येणाऱ्या अभिनव ट्रॅव्हल्स व कृष्णा ट्रॅव्हल्सचा अपघात होवून दोघांचा मृत्यू झाला होता या अपघाताची सखोल चौकशी करून ट्रॅव्हल्स चालक,मालक,यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी ४ जून रोजी स्वप्नील जाधव युवा मंचच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे अपघातात गंभीर जखमी झालेले गोपाळ विठ्ठल लांडगे यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटल लातूर येथे उपचार सुरू असून त्यांना शासनाने आर्थिक मदत करावी असेही निवेदनात म्हटले आहे,या अपघातात १५ ते २० प्रवाशी जखमी झाले होते. मृतास १५ लाखांची मदत द्यावी व जखमी झालेल्या व्यक्तीला ५ लाखांची मदत द्यावी अशी मागणी ३० मे रोजी स्वप्नील जाधव युवा मंचच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली होती,
0 Comments