माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष पं.स.सदस्य चंद्रकांत कांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश
उदगीर : माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विकासावर विश्वास ठेवून उदगीर पंचायत समिती देवर्जन गणातून निवडुन आलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत कांबळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी आमदार संजय बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवुन देवर्जन गणाचा सर्वांगीण विकास करावा असे सांगितले.
याप्रसंगी पंचायत समितीच्या देवर्जन गणातून अपक्ष म्हणून विजयी झालेले चंद्रकांत कांबळे यांनी आज उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संख्याबळात वाढ होऊन देवर्जन गणातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली आहे.
यावेळी पक्षाच्या ध्येय धोरणांवर विश्वास व्यक्त करुन सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देवुन देवर्जन गणाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वामुळे स्थानिक पातळीवर विकासकामांना गती मिळेल आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी जि. प. सदस्य प्रा. दिलीपकुमार मटके, जि.प.सदस्य ज्ञानेश्वर बिरादार, ,तालुकाध्यक्ष बालाजी भोसले पाटील ,ता. कार्याध्यक्ष वसंतराव पाटील,
,माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, कमलाकर फुले, पं. स. सदस्य विकी भोसले,
प्रा.शाम डावळे,ज्ञानेश्वर पाटील रावणगावकर, प्रा.शिवाजी देवनाळे, राजकुमार हुडगे, शुभम केंद्रे, लक्ष्मण कुंडगिर, गजानन बिरादार, विजय होनराव, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


0 Comments