उदगीर शहरातील सह दुय्यम निबंधक वर्ग - २ च्या इमारत बांधकामाचे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते भुमिपुजन
*उदगीर* : शहर हे तीन राज्याच्या सीमेवर असल्याने या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून शहरात विविध शैक्षणिक संस्था, विविध शासकीय कार्यालये,
अत्याधुनिक रुग्णालये, बाजारपेठ मोठ्या प्रमाणात असल्याने शहरात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये शहरातील बांधलेली घरे व परिसरातील जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी शहरात असलेल्या सह दुय्यम निबंधक वर्ग - २ च्या कार्यालयात नेहमीच गर्दी असते भाडेतत्त्वावर असलेल्या या कार्यालयात जागा अपुरी पडत असल्याने या उदगीर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सह दुय्यम निबंधक वर्ग - २ च्या नविन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करुन त्या इमारतीचे काम सुरु होत आहे. याचा मनस्वी आनंद आहे. मागील काळात विविध शासकीय इमारतीमुळे उदगीर शहराच्या वैभवात भर पडली असल्याचे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील पोलीस ठाणे परिसरातील सह दुय्यम निबंधक वर्ग - २ च्या इमारत बांधकामाच्या भुमीपुजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी लातूरचे सहजिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कल्याण कुलकर्णी, उदगीरच्या सहदुय्यम निबंधक सौ.स्वरुपा तोळमारे, तहसीलदार राम बोरगावकर, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, भाजपा शहराध्यक्ष अमोल अनकल्ले, महिला शहराध्यक्षा मधुमती कनशेट्टे, श्याम डावळे, समद शेख,माजी नगरसेवक अनिल मुदाळे, फय्याज शेख, नरसिंग शिंदे, विलास शिंदे, व्यंकट बोईनवाड, इमरोज हाशमी, सय्यद ताहेर हुसेन, इब्राहिम नाना पटेल, शिवकुमार कांबळे, बाळासाहेब पाटोदे, श्रीहरी पाटील, इम्तियाज शेख, हुस्ना बानो, उर्मिला वाघमारे, शफी हाशमी, इम्रान शेख, शिवकुमार पांडे, संदीप देशमुख, राहुल सोनवणे, संघशक्ती बलांडे, सुशिलकुमार शिंदे, बापू साळुंखे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी,
भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून दुसऱ्यांदा मला काम करण्याची संधी आपण सर्वांनी दिली म्हणूनच या भागाचा कायापालट करण्यासाठी मी रात्रंदिवस काम करत आहे. भविष्यात ही अशाच शासनाच्या विविध योजना मतदार संघात आणणार आहे. मागील काळात या भागाचा चेहरा मोहरा बदलून महाराष्ट्रात उदगीर एक मॉडेल शहर म्हणून नावारुपला आणले आहे. आपल्या उदगीर शहराचे नाव हे एक सांस्कृतिक शहर म्हणून संबंध देशात गाजत आहे.
शहरातील सह दुय्यम निबंधक वर्ग - २ च्या इमारतीमुळे उदगीर शहराच्या वैभवात भर पडणार आहे. या शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात होत असलेल्या सह दुय्यम निबंधक कार्यालयामुळे नागरीक व व्यापारी सुरक्षित असुन जनतेच्या सोईचे हे कार्यालय होणार असल्याचे ही आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी उदगीर शहरातील व्यापारी व नागरीक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments