परिवर्तन नागरी वसाहत सोयासटीची स्थापना,नूतन कार्यकारिणीची निवड
उदगीर शहरा लगत असलेल्या नेहरू नगर,भोसले नगर देगलूर रोड उदगीर येथील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी परिवर्तन नागरी वसाहत सोसायटीची स्थापना करून नूतन कार्यकारिणीची निवड केली सोसायटीच्या माध्यमातून नेहरू नगर व भोसले नगर येथे नागरिकांच्या हिताचे विविध विकास कामे व्हावेत यासाठी सोसायटीची स्थापना केली,परिवर्तन नागरी वसाहत सोयासटीच्या अध्यक्षपदी सत्यवान व्यंकटराव भोसले तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत बाबुराव कुलकर्णी,सचिवपदी हरिबा भूजंगराव पिंपळे,कोषाध्यक्षपदी संग्राम पवार तर चंद्रकांत राठोड, संजय कपाळे,शेषराव जाधव, राजेंद्र रोडेवाड,गणेश बाळे,पिराजी धोत्रे,संभाजी मिरकले यांची सदस्य म्हणून एकमताने निवड करण्यात आली.


0 Comments