Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

महापुरुषांच्या विचाराने नव्या पिढीला प्रेरणा मिळते : माजी मंत्री आ.संजय बनसोडे

महापुरुषांच्या विचाराने नव्या पिढीला प्रेरणा मिळते : माजी मंत्री आ.संजय बनसोडे

पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर चौकाचे आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पण

*उदगीर* : आपल्या सर्वांवर बालपणापासूनच महापुरुषांचा विचार आपल्या पूर्वजांनी आपल्यात रुजविले आहेत. आपल्या सर्व महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपले जीवन जगत असतो. आपल्या पूर्वजानंतर आता आपण आपल्या पुढच्या पिढीला सर्व महापुरुषांचे विचार सांगुन त्यांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्नशील असतो कारण
महापुरुषांच्या विचारानेच नव्या पिढीला प्रेरणा मिळत असल्याचे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर तालुक्यातील देवर्जन येथील पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करुन विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, 
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती आहे म्हणून आजचा दिवस हा पवित्र आहे. राजमाता अहिल्याबाई होळकरांनी भारतभर अनेक मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या. त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. विविध सामाजिक सुधारणा करुन लोकांच्या हितासाठी काम केले अशा राजमातेस मी नतमस्तक होतो.
यावेळी देवर्जनसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात